STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

3  

Sunita Ghule

Inspirational

धुके दाटलेले

धुके दाटलेले

1 min
1.5K


धुके दाटलेले


रेशमाची मऊ दुलई

धुके दाटलेले प्रभाती

गारवा सुखद मनस्पर्शी

सृष्टीवर जडवते प्रीती।



आच्छादणारा सुरेख देखावा

अथांग दरीत पसरतो

मायेने मग कवेत घेवून

अवघ्या सुष्टीला सुखवितो।


रविकिरणाशी होता मिलन

दवबिंदूचे लाभते रूप

तहान शमवूनी तृणपात्यांची

मोत्यांचे साजिरे लोभस स्वरूप।


मंदिराच्या गाभाऱ्याला जसा

धूपदिपाचा दैवी दरवळ

निसर्गदेवतेच्या आरतीला

शुभ्र धुके दाटलेले विरळ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational