धरा मनात लाजली
धरा मनात लाजली
आस प्रीतीच्या भेटीची, कशी मनास लागली||
आली पावसाची सर, धरा मनात लाजली||
धरा झाली ओलीीचिंब, गंध मातीचा सुटला|
जसा मोकळ्या केसात, कोणी गुलाब माळला||
गेला पाऊस पडून, ओलीीझाली सारी माती|
कशी फुलारोनी येईल आता, तरारून शेती||
वेेलीी झाड सारी, कशी डोलती खुशीत|
जसा प्रीतीचा मोगरा कोणी माला केसात||
धुंद झाली वनराई, वेलीीफुलांनी सजली|
धरणी मातेच्या कुशीत, नव बीज अंकुरली||
निळ्या नभाच्या अंगणी, मेळा कशाचा जमला|
पावसाच्या थेंबासाठी मेघ आकाशी थांबला||
प्रीत फुलविण्यासाठी, मनी बांधला बंगला|
ताला सुरात नाचेल आता, पाऊस चांगला||
सर पावसाची येता, प्रीत मनात लाजते|
शालू नेसून हिरवा, गोड गालात हसते||
कशी मोहरली काया, झिंक मनात उठली|
प्रीतीच्या पाखरा आता, झोप ग कुठली||