STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

धाव आता जगदीशा

धाव आता जगदीशा

1 min
234

आली क्रूर महामारी

सुरु तांडव रोगाचे

झाले बाधित असंख्य

किती शापित मृत्यूचे


किती संसार मोडले

किती बालके अनाथ

किती घरातले सुख

विस्कटले दीनानाथ


असहाय्य दीनवाणे

आक्रंदन नि विलाप

ऐकवेना आता मज

देवा द्यावा हो उःशाप


प्रभू एकच मागणे

देसी जना जीवदान

काही चुकलेमाकले 

विसरावे मानपान


थांबवावे परमेशा

सत्र हे मृत्यूपाशाचे

दान द्यावे मनुजाला

निरामय आरोग्याचे


सर्वेसर्वा तू विश्वाचा

कर्ता दाता अन् त्राता

धाव आता झडकरी

जगदीशा प्राणदाता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy