Savita Jadhav

Tragedy Inspirational


3  

Savita Jadhav

Tragedy Inspirational


धागे संवेदनांचे

धागे संवेदनांचे

1 min 215 1 min 215

धागे संवेदनांचे परोपरीने,

जोडावे कसे आणि कितीदा,

जपाव्या मनातल्या साऱ्या भावना,

लपवाव्या व्यथा अन्‌ स्पंदना.


संवेदनाचे ओझे घेऊन,

का बरं सतत तुझ्या आठवणीत झुरावे,

बंध रेशमाचे जुळवता जुळवता,

का स्वत:च रोज चिंतेत मरावे.


धागा स्नेहाचा गुंफण्यासाठी,

संवेदना मनातल्या एकवटल्या,

जीवापाड जपलेल्या नात्यांनीच,

साऱ्या त्या क्षणात विस्कटल्या.


धागे संवेदनाचे जुळती ह्रदयातूनी,

जपता हे नाजूक, हळूवारपणे प्रेमानी,

बहरास येतसे ऋणानुबंध स्नेहाचे,

जगण्यास येई गोडी मिळे नवी कलाटणी.

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠


Rate this content
Log in

More marathi poem from Savita Jadhav

Similar marathi poem from Tragedy