सलाम
सलाम
सलाम राजा सलाम
तुझ्या दुनियेला सलाम
आंधळं दळत कुत्रं पीठ खात
तुझ्या प्रशासनाला सलाम
तुझ्या आघाडीला सलाम
तुझ्या बिघाडीला सलाम
सर्व पक्ष्यांना सलाम
सर्व रंगाला सलाम
गरिबांच्या हाताला कुठं आहे काम ??
गरिबांना सलाम श्रीमंत सलाम
तुझ्या झोपडपट्टी ला सलाम
मूठभर बंगल्यानं पण सलाम
पोटातील भुकेला पण सलाम
मीठ भाकरीचा कुठं आहे घाम
शेतकऱ्यांनो तुम्हाला सलाम
तुमच्या कष्टाला सलाम
आत्महत्या ला पण सलाम
त्यांच्या आत्म्याला सलाम
दुःखी कष्टी बांधवांनो
कुठं उरलाय शेतीत राम
अलबत्या सलाम गलबत्या सलाम
तुमच्या उचपतींना ही सलाम
गरीब रिकाम्या टेकड्या मंडळींना
जग आहे हराम
