वासनेची भूक
वासनेची भूक
भूक लागता वासनेची
भावना मनी उरत नाही
पर स्त्रीमध्ये तयांना
माता भगिनी दिसत नाही।
वाटते तयांना आहे स्त्री
उपभोग घेण्याचे साधन
दुष्कृत्यांमुळे जाहले आहे
सामाजिक मूल्यांचे अधःपतन
ज्या योनीतून जन्मले ते
करतात तिच्यावर अत्याचार
घृणास्पद ह्यांच्या कार्यामुळं
माजलाय सर्वत्र हाहाकार।
घडतोय नवीन रोज बलात्कार
दररोज कळी कुस्करली जाते
फुल होऊन सुगंध देण्याचे
तिचे स्वप्न राहूनिया जाते।
सुजाण नागरिक, जागृत व्हा
लेकी-पोरींना बनवा शूर
शिकवा लढायला हिमतीने
"बलात्काऱ्याला धडा शिकवला"
असा घुमुदे स्त्रियांच्या पराक्रमाचा सूर
