STORYMIRROR

DNYANESHWAR ALHAT

Tragedy

4  

DNYANESHWAR ALHAT

Tragedy

सारीपाट_जीवनाचा

सारीपाट_जीवनाचा

1 min
414

फाटलेलं आभाळ अन्,

उसवलेलं आयुष्य,

डोळ्यांत उभं होतं,

भरकटलेलं भविष्य।

      वृद्धाश्रमाच्या दारापाशी,

      पाऊले येवून ठेपलेली,

      काळजातलेच आप्तेष्ट,

      भौतिक सुखामागे लपलेली।

तळहाताच्या फोडापरि,

जपले होते आजवर,

भले व्हावे त्यांचे म्हणून,

केला होता नित्य जागर।

        कमावले काय अन् ,

        काय होते गमावले,

       अंदाज जरा घेतानांच,

       डोळयांत अश्रू दाटले।

एकटेच आयुष्य हे,

अनोळखी उंबऱ्याशी,

सारीपाट जीवनाचा,

हरलो होतो स्वतःशी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy