भीती
भीती
बदलत चालली जीवनशैली
हातात नको भाजीची थैली
आळसाने व्याधी ग्रासली
मनुष्य यंत्रामुळे सुखावली
आरामाच्या जीवनात
भीती फार वाटत आहे
भीती वाटते कोणत्या वेळी
कोणती होईल व्याधी
खोकला झाला की
भीती मला क्षय रोगाची
गाठ आली तर
भीती वाटते कॅन्सरची
सगळीकडे आहे नुसते
थायरॉईड बीपी शुगर
भीती वाटते मला
होणार तर नाही फीवर
