माझी आजी
माझी आजी
नशीबवान मी जीवनी
जन्मले या कुटुंबात
एक नात त्यातल
अजूनही जपलय मनात
नाव तयाचे दुर्गा
भोळी स्वभावाने
प्रेमळ मनाने खूप
वागणे आत्मीयतेने
खूप जीव होता
तिचा हया नातीत
सांभाळ केला माझा
नाही विसरणार जीवनात
केल्या कितीही खोड्या
लपवल्या सदा पाठी
मार पडे मामा मावशीला
माझ्या चुकी साठी
दिला कितीही त्रास
सदा साहिला आनंदाने
केल संगोपन बालपणी
मन मोकळे पनाने
अस किती वर्णू
माझ्या आजीला
कमी पडतील शब्द
तिच्या आळवणीला
आज नाही ती आमच्यात
खंत ही अंतःकरनी
परी देत राहते आशीर्वाद
सदा येऊनी मम स्वप्नी
