लोककाव्य
लोककाव्य
ऐका हो ऐका आजच्या जमान्याची कहाणी ...
बदलत चालली माणसाची राहणीमाणी ....
माणसुकी आपलेपणाला नाही आता कवडीचे मोल ...
जो तो बोलतो आता पैसे से तू बोल ...
भयानक घटनांनी जीव होतो कासावीस ....
कधी थांबणार महिला वर होणाऱ्या अत्याचाराच विष ...
कधी निघणार कसा नियम जो थरथरून टागवेल त्या राक्षसाचे हृदय ...
न करण्यासाठी असे गुन्हे परत ...
कधी संपणार हे खून चोरीचे सत्र ....
प्रत्येक दिवशी वर्तमानपत्रात वाचून होते मन त्रस्त
ऐका हो ऐका आजच्या जमान्याची कहाणी
खूप वाईट चालाय सार काही ...
कांदा रडवात आहे सगळ्यांना .....
कस घर चालवावं हा प्रश्न पडलाय सगळया गृहिणींना ..
महिन्याचं बजेट झालंय डळमळीत ...
घरात येत नाही अपेक्षा सारखी पगाराची सरबत्ती ..
सामान्य माणूस मोडकळीस आलाय ...
कशासाठी खर्च करावे व कशी सेविंग करावी हा प्रश्न पडलाय ....
ऐका हो ऐका आजच्या जमान्याची कहाणी ..
महागाईने घेतली आहे झेप मोठी ....
आपले सगळे बांधव राहावे सुख शांतीत नको कसला अत्याचार नको कसली गळचेपी असे वाटते मनात कुठेतरी ....
प्रत्येकाने विचार करायला हवा कि मनाच्या गाभाऱ्यात बसवावं राक्षस कि देव पूजे साठी ...
तरच हे अत्याचार संपतील तरच हे राजकारणी आपले स्वार्थ सोडून जनतेच्या भल्यासाठी लढतील ....
आपला देश पुढे नेण्यासाठी प्रत्येकाच्या हातभाराची गरज आहे ...
त्यासाठी एकतेची गरज आहे ...
ऐका हो ऐका आजच्या जमान्याची कहाणी .. ....
सगळ्यांनी सुख शांतीत नांदायला प्रत्येकाने आपली मानसिकता बदलायला हवी .....
