निरोप
निरोप
कोसा कोसा वर राहती सारे, खुशाली लिहुनीया पाठवती.
खबर कशीही असू देत, माध्यम एकच वापरती.
सुखाचे डोहाळे असो की दुःखाचा डोंगर, उतरती अलगद पानावरती.
कोनी तरी येईल निरोप घेऊन, डोळे लागले दारावरती.
मास्तर जणू सगळ्यांनाच जवळचा, त्यांच्याच परिवारातील.
चाय पाणी नंतर होईल, आधी चिठ्ठी खडाखडा वाचतील.
परिवार तो असायलाच पाहिजे, माहिती आहे सगळ त्याला.
शेवटचा निरोप हाती आणून दिला, आईचाच माझ्या मला.
दिसत होती आई मला, मास्तर पत्र आणि निरोपात.
शेवटचा आशीर्वाद दिला होता, तिने आयुष्याच्या विरहात.
