विश्व शांती
विश्व शांती
आतंकवाद,दहशतवाद अन्
हिंसाचारांचे स्तोम माजले आहे!
अती मादक पदार्थ, देह व्यापाराने
मानवतेला काळे फासले आहे!!१
खून,दरोडे, लैंगिक अत्याचार
यांनीच जगाला ग्रासले आहे!
बेरोजगारी,वाढते शहरीकरण
असंख्य व्याधींनी त्रासले आहे!!२
समाज माध्यमातून जग आज
अधिकाधिक जवळ येत आहे!
कौटुंबिक नात्यांमधील तणाव
एकमेकांना दूरच दूर नेत आहे!!३
या साऱ्या ज्वलंत प्रश्नांतून
जगाला मुक्त व्हायचेच आहे!
सुख समाधानासाठी जगाला
विश्व शांतीत न्हायचेच आहे!!४
जागतिक ज्वलंत समस्यांसाठी विश्व शांती गरजेची त्या साठी वसुधैव कुटुंम्बकम् नारा हवाच!
