STORYMIRROR

Prshuram Sondge

Tragedy Others

4  

Prshuram Sondge

Tragedy Others

पुरूषत्व

पुरूषत्व

1 min
419

तू माझ्यात खोल खोल

रूतत गेलासं पार तळाशी....

मी किती कष्टाने नितळ केला होता

माझ्या मनाचा तळ... मनातला साराचं गाळ

उपसून काढायला जमतं

अस नाही मी त्यावर अंथरली होती.

सजवली होती सुंदर सुंदर....

अस्तर नि सा-या संवेदनाही

सोलून, तासून,

रांधून केल्या होत्या

गुळगुळीत... एकदम चकचकीत.

भावनांही रंग दिले होते.

माझ शरीरच नाही तर

मी

आख्खीच तुला आवडावी म्हणून....

मी

अधिकच स्वतः ला पारदर्शक

व सुंदर करत गेले.

उपटून काढाव्यात पापण्या

रेखीव, आखीव

दिसण्यासाठी

तशीच उपटली

मी

मनावर नुकतीच कोवळी कोवळी

अंकुरलेली नाती

नि अगदी फ्रेश

होऊन तुझ्यासमोर

पेश केलं स्वतः ला.

तू

नुसता

ओरबडत राहिलास माझं

शरीर....माझे अवयव.

माझ्या मनातले स्वप्न

भावना नि साध्या संवेदना

ही तुला का जाणवल्या नसतील?

तू पुरूष आहेस

नि मी एक स्त्री

नुसतं शरीरंच स्त्री असत नाही तर

ती अख्खी च असते ना?

स्त्रित्व तसच ठेवून

सोलून काढता येईल

माझं शरीर नि तुला हवे हवे

असलेले माझे मादक अवयव?

अस कर तुझा ही सिध्द होईल

पुरूषत्व


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy