STORYMIRROR

Prshuram Sondge

Tragedy Others

3  

Prshuram Sondge

Tragedy Others

पाहणी दौरे, शेतकरी राजा व राजकारण वगैरे

पाहणी दौरे, शेतकरी राजा व राजकारण वगैरे

1 min
201

कॅमेरे, माईक्स... आणि सेल्फी स्टीक घेऊन...

पत्रकारांच्या टोळ्या घेऊन

ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले

संवेदना कोरड्या

व जाणीवा अगदीच़ रूक्ष

वाटू नाहीत म्हणून ते रानात गेले


विरोधी पक्षनेते वावरात भिजून फोटो शूट करू शकतात...

या भितीने असेल कदाचित...

ते वावरात गेले...

पाण्यात भिजले...

अर्थात

कॅमेरे बंद नव्हते.

पाहणी दौरे... लाईव्ह होते.

शेतकऱ्याचं दु:ख असं ग्लोबल झालं.


काळीज पिळवटून निघंल

इतकं ते... गहन झालं.

राजा हो कसं सांगू?

तुमचं दुःख चक्क

ब्रेकिंग न्यूज झाले.


पण

काळीज खरडून न्यावं तशी माती खंदून गेली होती.

वावराचं तळ झालं होतं.

पिकं पाण्यात पोहत होती.

बांधावर मुंडी गुडघ्यात घालून तो बसला होता.

बळीराजा...

तथा

मुलाच्या पाठ्यपुस्तकातील शेतकरीदादा.


डोळयातलं पाणी आटून गेलं होतं...

स्वप्नं करपुन गेल्यावर ओल...

डोळ्यातली व जगण्याची कशी तग धरील?

कोरडंठाक झाले होते डोळे नि जगणंसुध्दा.

भर वैशाखात कोरडीफट पडलेल्या

भयाण विहिरीसारखं. 


कुठल्याचं कॅमेऱ्यात हे नाही कैद झालं.

बळीराजा हात जोडू उभा होता

त्याच्याच लोकसेवकासमोर...

भिकारी होउन...


राजकारणाचं विचाराल तर

बगलबच्चे, लुच्चे घेऊन छान रंगलंय 

नेहमीच्या उत्सहानं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy