STORYMIRROR

Ashwini Mengane

Tragedy

4  

Ashwini Mengane

Tragedy

तिच्यातला तो...

तिच्यातला तो...

1 min
450

काया तिची स्त्रीची

पण बांधा पुरुषांचा...

कोण करतंय हो विचार

त्याच्या चांगुलपणाचा..."१"


पुरुषत्व असूनही

स्त्रीत्वाकडे झुकलेले...

वेशभूषा लैंगिकता कसं

सारच

स्त्रियांसारखं निर्मिलेले..."२"


पुरुषासारखे मोठ्याने हसणे

पण बाईसारखे लाजण जमत नाही...

पुरुष असूनही स्त्रीत्वाची ओढ

पण समाजही पटवून घेत नाही..."३"


ना समाजात स्थान ना

नशिबी आई ना बाप...

जन्म त्यांचाच त्यांना

सदाच वाटतो हो शाप..."४"


ना नर ना मादा हा

कोणता विकृतीचा खेळ...

समाजातही

स्त्री-पुरुषांशी ना बसतो

कधी हो मेळ..."५"


टाळ्या पिटाळून भीक

मागूनच भरतात पोट...

ढोंगी समाजाच्या नजरेत

सदाच हो खोट..."६"


तेव्हा कुठेतरी वाटते

व्हावी एकदाची भेट...

आणि सार्‍या दुःखी वेदना

बोलाव्यात नजरेशी थेट..."७"


जेव्हा कळेल त्याला

तिच्यातला तो...

स्त्रीच्या वेशभूषेत

लपलेला पुरुषच तो..."८''


ना नर ना मादा पण

तरीही त्याच्यातली ती...

आपल्या स्त्रीच्या भावना

रडून व्यक्त करेल का ती..."९"


समजून घ्या हो कधीतरी

तुम्हीही त्याच्यातल्या तिला...

छक्का, हिजडा म्हणून

हिणवू नका तिच्यातल्या त्याला..."१०"



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy