STORYMIRROR

Ashwini Mengane

Others

4  

Ashwini Mengane

Others

प्रेमात तुझ्या

प्रेमात तुझ्या

1 min
161

तुझ्याशिवाय कुठे

माझे हलते गं पान...

तू नसताना विरहात या

जळतयं मनाचे रान..."१"


तुझा हा विरह मला

जाळी गं क्षणाक्षणाला...

विरह हा संपणार कधी

इतकीच हुरहूर मनाला..."२"


तू नसताना साथीला

असा विरहात जळतो...

की ऐन पावसात विरहाचा

हा वणवा उरी भडकतो..."३"


ना शमणार आता

हा मनाचा विरह अग्न...

तुझ्या प्रेमात प्रियकर वेडा

विरहाने झालोय मी भग्न..."४"


Rate this content
Log in