वेडी झाली राधा...
वेडी झाली राधा...
वेडी झाली राधा
कृष्णा तुझ्या वेड्या प्रेमासाठी...
तिला लागली तृष्णा
फक्त तुझ्याच भेटीसाठी...
सावळा रंग कृष्णा त्या
वेड्या राधेला तुझा भावला...
तुला पाहून तिचा तिच्यावर
ताबा कुठे राहिला...
तुझ्या प्रेम वर्षावाने होते
तिला चिंब चिंब भिजायचे...
तुझ्या प्रेमातच होते तिला
कृष्णा खूप खूप प्रेम नहायचे...
आतुर तिचा जीव तो
फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी...
येशील का रे धावून तू
एकदा तरी तुझ्या राधेसाठी...

