STORYMIRROR

Ashwini Mengane

Others

3  

Ashwini Mengane

Others

ग्रामीण भारत

ग्रामीण भारत

1 min
283

बळीराजाचे वास्तव आहे

जिथे तोच ग्रामीण भारत...

उभ्या जगाचा पोशिंदा तो

रात्रदिन असतो हो जागत...


कोंबड्याच्या आरवण्याने

जिथे होते हो सकाळ....

भजन किर्तनानेच रोज

होते इथे संध्याकाळ...


लता,वेली, वृक्ष सारे

डोलती हो वाऱ्यासवे...

शिवारात काम करे माय

अनवाणी पायाने बाबासवे...


ग्रामीण भारतात अजूनही

शेजार हो आपुलकीने जोडलेला...

नाही तिथे शहरांसारखे

फ्लॅट सिस्टिमने तो तोडलेला...


अतिथी देवो भव म्हणून

ग्रामीण भारत आजही जपलेला...

नाही तिथे कुणीही शहरांंसारखे

स्वार्थी अहंकाराने टपलेला...


आजही आहे स्वच्छ आणि सुंदर

आपला ग्रामीण भारत...

हिरवा शालू परिधान केलेली वसुंधरा

आजही आहे करित स्वागत...


असा हा आपला ग्रामीण भारत...


असा हा आपला ग्रामीण भारत..


Rate this content
Log in