STORYMIRROR

Ashwini Mengane

Romance

4  

Ashwini Mengane

Romance

सांग कितीदा नव्याने...

सांग कितीदा नव्याने...

1 min
230

सांग कितीदा नव्याने तुला आठवावे...

या भरल्या नयनात तुलाच का साठवावे...

तुला पाहताच मग मी का रे असे भुलावे...

की अवतीभवती साऱ्या जगालाच विसरावे...


सांग कितीदा नव्याने तुला आठवावे...

पुन्हा पुन्हा का मीच तुला असे रे पाहावे...

की माझे सख्या सारे देहभान हरपावे...

नको नको म्हंटले तरी तुलाच आठवावे...


सांग कितीदा नव्याने तुला आठवावे...

इतकेही मग या वेड्या जीवाला न कळावे...

तू माझा नसताना का रे मी तुलाच पाहावे?...

का मग नाही सख्या मी तुला विसरून जावे...


कितीही ठरवले तरी मन राजी न व्हावे..

सांग ना कितीदा तुला मी नव्याने आठवावे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance