दहा एप्रिल(10)
दहा एप्रिल(10)
पं गा घेतला माझ्या बांधवांनी
ध डक देण्या संकटाला
रा त्रंदिवस जागता पहारा दिला
व्या धी मुक्त आम्हा ठेवण्याला...
दि वे लागणी होता
व स्तीला घरी जाण्याची वेळ होते
सा वधगिरी मुळे
चि मणी पाखरांना दूरच ठेवावे लागते...
शू रवीर नरवीर हे सारे
भ व्य दिव्य कार्य करीत आहेत
रा ष्ट्र हितासाठीच जीवाचे रान करून
त्र स्त जीवनही आनंदात कंठीत आहेत...
अभिनंदन आभार शब्द
खरोखरच कमी पडतात
बांधवांनो तुमचे कार्य पाहून आमचे
विनम्रतेने आपोआप हात जुडतात....!
