दगडातील देव
दगडातील देव
ऊन वारा पाऊस येतो
भराभरा निघून जातो
हालत नाही चालत नाही
खातपित काहीच नाही
एका जागी बसून राहतो
ढेकर मला येत नाही
ओबडधोबड रूप माझे
काळा करकरीत रंग माझा
ठोकर मारून मला जातात
कधी मला फोडून टाकतात
कधी कुणाच्या कामी येतो
सुशोभित कलाकृतीत दिसतो
आकार देऊन मुर्तीत दिसतो
मी दगडाचा देव होतो
फुले माझ्या पायांशी लोळता
मलाच मान देतात
येताजाता लाथा मारणारे
तेच पायांशी वाकतात
दगड दगड म्हणणारे
देव देव म्हणून पूजतात