STORYMIRROR

Padmini Pawar

Action

3  

Padmini Pawar

Action

देवु धैर्याने लढा

देवु धैर्याने लढा

1 min
14.8K


रुसले कंकण , पुसले कुंकु

आभाळ कोसळं डोईवरी

पाखरे तिची इवली इवली

बोझ तिच्या खांद्यावरी

आधार गेला हरवुन

वय कोवळे तारुण्याचे

अश्रु गेले सुकुन

भान हरपले जगण्याचे

जग हपापले तिला पाहुन

टपले लचके तोडण्या

किती घ्यावे साहुन

संसार निघाला मोडण्या

कणखर ती बनली

टोचुनी काटे चालली 

चंग तिचा कठीण झाली 

कधी दुर्गा चंडी धगधगली 

दिला धैर्याने लढा 

अंगणी कष्टाचा सडा 

उभी ठाकली नाही वाकली 

दिला धैर्याने लढा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action