देवदूत
देवदूत
ती निराधार माऊली
होती पिल्लांची साऊली
लाभे दिर्घसमाधान तिला पिल्लांच्या उबेत.....
विसरूनि त्राण सारे घ्यायची त्यांना कवेत
लोटला काळ अन् पिल्लांच्या पंखात आले बळ.....
वाटले तिला फार , आता तरी मिळेल कष्टाचे फळ
घेतली पिल्लांनी अवकाशात उत्तुंग भरारी .....
मग्न झाली करण्यास पूर्ण स्वप्नं सारी
यशशिखर गाठता, पिल्ले विसरली ते क्षण ......
दुराविले आप्त तेव्हा माऊलीचे विदारीले मन
पिल्लांची महत्तकांक्षा होती फारच विकारी.......
असूनही सर्व झाली ती माऊली भिकारी
एकेदिवशी तिला भेटला , रस्त्यात देवदूत .......
देऊनी अन्नपाणी घडविले सुख अद्भूत
माऊलीने देऊ केले स्वखुशीने त्याला चार आणे .......
पाहूनि तिचे आनंदाश्रू त्याने नाकारीले मोठ्या मनाने
ती निराधार आणि असहाय्य माऊली .....
आज शोधते स्वतःसाठी साऊली .......!!!
