देणं समाजाचे
देणं समाजाचे
देणं समाजाचं लागतो मी
आठवण आहे याची मला
प्रसंगी रडवलं तुडवलं अन्
घडवलंसुद्धा यानेच मला
याच समाजाने दाखवले
जगायचे नवनवे मार्ग मला
पडल्यावर उठून पुन्हा
उभा राहायला शिकवलं मला
याच समाजाने भागवली
दोन वेळची पोटाची कोंडी
निसटलेल्या आसवांना दिली
प्रेमाची मायाळू मांडी
देणं समाजाचं लागतो मी
शिकवलं ज्यांनी लढायला
अन्याय सहन न करता
अन्यायाचे बुरखे फाडायला
