डॉक्टर एक देव, वेळ करोनाची, साथ देवाची
डॉक्टर एक देव, वेळ करोनाची, साथ देवाची


डॉक्टर तुम्ही आहात एक देव,नाही कल्पना करवत दुसरी, तुम्ही आहात फक्त देव, हेच सत्य आहे एकमेव!
प्रत्येक रुग्णाला करोनासारखा संसर्गजन्य आजारांपासून वाचवतात तुम्ही!
रुग्णांसाठी स्वतःचा जीव गहाण ठेवतात तुम्ही!
नाही पाळली जात जेवणाची वेळ तुमची!!
सदैव हजर असतात रुग्णांच्या सेवेत तुम्ही!
गंभिर रुग्णाचा श्वास , बनणारे देवदूत तुम्ही!
रुग्णाला जीवनदान देऊन, प्रत्यक्ष येणाऱ्या यमदूताला परत पाठवतात तुम्ही!!
धन्यवाद डॉक्टरसाहेब, माझ्या जिवाच्या तुकड्याला वाचवले तुम्ही,असे म्हणणारे येतात नातेवाईक!
असे म्हटल्यावर आनंदाश्रू लपवतात तुम्ही!
तेच आभार बनते सामर्थ्य तुमचे, कारण सदैव जिवनदान देण्याची असतें शर्यत तुमच्यापुढे!!
रूग्ण गरीब असो की श्रीमंत असो,कास धरतात तुम्ही फक्त त्याला वाचवायची!
अचूक निदान करण्यासाठी लावतात तुम्ही कसोटी पूर्ण प्रयत्नांची!!
नाही वेळ मिळत स्वतःच्या कुटूंबाला!
रुग्ण सेवा हीच कुटुंब सेवा, अशी समजूत घालती मनाला!!
म्हणून वाटते, डॉक्टर एक महान व्यक्तिमत्व!
रुग्णसेवा हेच त्यांच्या जिवनाचे तत्व!!
डॉक्टर एक कुशाग्र बुद्धीमान व्यक्ती!
जिच्यासम नाही दुसरी प्रतिकृती!!२!!