STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

डोंगर कुशीत

डोंगर कुशीत

1 min
65

डोंगरांच्या कुशीमधे

गाव वसले छोटेसे

वृक्ष वल्ली सोबतीला

हर्षोल्हास तिथे वसे


जिणे कष्टाचे लोकांचे

चढे रोज डोंगरात

वर्षाकाली पाणी खाली

साचे अमाप खोरीत


लोक राहती आनंदे

सारे गुण्यागोविंदाने

ढगफुटी अकस्मात

अवकाळी पावसाने


घरे सारी कोसळली

झाली जीवित हानीही

देती हात एकमेकां

त्वरे जीव वाचवूनी


डोंगराच्या कुशीतले

गाव जाहले उध्वस्त 

लोक पीडीत दुःखाने

गाव झाला शोकग्रस्त


दुःखे पहाड हलला

नाही आवरले अश्रू

लोक हलविले सारे

वाहे डोंगर दुःखाश्रू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract