डॉ. एक देवमाणूस
डॉ. एक देवमाणूस
समजावले मी त्या दु:खी रोग्यास
नको डोळ्यांत तू पाणी आणूस |
होशील पुर्ववत पाठीशी आपल्या
आहे डॉ.सारखा एक देव माणूस | |१| |
सा-या वेदनांवर फुंकर घालून
करतात बरे डॉक्टर आपणांस |
देवासारखे येतात मदतीला तेच
दृष्टी देती अधूस देवून ढापणास | |२| |
उपचार रुग्णांवर करतात प्रयत्न
पूर्वक अगदी यशस्वी होईपर्यंत |
कधी त्यांचा निरुपाय होतो दोरीच
कमकुवत करते आयुष्याचा अंत | |३| |
कधी तुमचं सकारात्मक बोलणंच
निम्मा आजार करतो हो बरा |
डॉक्टर तुमच्या सेवाभावीवृत्तीने
लाभतो कुणातरी नवा जन्म खरा | |४| |
कधी तुमच्याच रुपाने अवतरतो
देवच जणू एखाद्या रोग्यासाठी |
विश्वासाने शरण आपल्याला येती
आरोग्य त्यांचे पूर्ववत होण्यासाठी | |५| |
