डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर
काय वर्णन करू सांगा
डॉ आंबेडकरांची गाथा
सारा भारत टेकवितो
त्यांच्या चरणी हो माथा।।
दिनदलितांचा जीवनभर
केला रात्रदिन झटून उध्दार
गरीब व वंचिताना दिधला
भक्कम असा आधार।।
सारे आयुष्य आपले वेचले
देण्या पददलितांना हक्क
तयांची पाहूनी विद्वत्ता
सारे जग झाले थक्क।।
जगातील सर्वात विद्वान म्हणून
झाला भारतरत्नाचा सन्मान
कोलंबिया विद्यापीठाने दिधला
तयांना हा अमूल्य बहुमान।।
वेगवेगळ्या 64 पदव्या
असती त्यांच्या नावावर
प्रभुत्व असती तयांचे
वेगवेगळ्या 9 भाषावर।।
50 हजार पुस्तकांचा
असे राजगृही संग्रह
विवेकवादी विचारांचा
असे तयांचा आग्रह।।
बोधिसत्व या उपाधीने
तयांना केले सन्मानित
तयांच्या शिष्याचा
जनसागर होता अगणित।।
साऱ्या जगी या भारतरत्नास
मिळतो आदराने बहुमान
समस्त भारतीयांची यामुळे
सन्मानाने उंचावते मान।।
