डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
संविधानाच्या शिल्पकारास
मनोभावे चला पूजू या,
बाबासाहेबांचे विचार स्मरून
चला संघटीत होऊ या.....
जातीधर्म विरहीत प्रबुद्ध देशाचे
स्वप्न साकार करण्यास झटले,
रक्ताचा एकही थेंब न सांडता
समाज परीवर्तन घडविले...
मार्गदात्याचा वारसा आपण
पुढे चालवत एकीने नेऊ या,
प्रज्ञा, शील, करूणा तत्त्वांची
सांगड सारे आपण घालू या...
समतारहीत समाजाचे स्वप्न
पूर्ण करण्यासाठी झटू या,
सांविधानिक मूल्यांना आता
कृतीत उतरवून दाखवूया....
देशाच्या समस्या समजून घेऊन
एकजूटीने विजय मिळवू या,
संघटन शक्तीचा परामर्श देऊनी
भारतमातेस आता हसवू या...
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
