डिजिटल पहाट...!
डिजिटल पहाट...!


डिजिटल पहाट...!
पूर्वी सारख कोंबडा आरवत नाही
चहा घ्या म्हणून हाक येत नाही
विहिरीवर घागरी वाजत नाहीत
पहाट झाल्याचे कळत नाही
वासुदेव गाताना गल्लीत दिसत नाही
गळ्यातली घंटा जनावरांची वाजत नाही
चक चक हा हा आवाज कानी पडत नाही
पहाट झाल्याचे कळत नाही
गोठ्यात जनावर असत नाही
दारात भाजी येत नाही
भिक्षेसाठी सकाळी झोळी दिसत नाही
पहाट झाल्याचे कळत नाही
टू टू टू कानाशी होते
बाय बाय पोर करतात
जाताना सार ठेवलय म्हणतात
पहाट झाल्याने दगड नात्याचे पडतात
दरवाजा खाडकन वाजतो
पेपरवाला पेपर फेकतो
दुधवाला दूध टाकतो
आणि नवीन दिवस सुरु होतो
घरास मग जाग येतें
घर खायला उठते
रिकाम्या घरट्यात
एकाकी झुंज जीवनाची सुरू होते
म्हंटल प्रगती झाली
पोर स्वतःभोवती फिरू लागली
पंखात बळ येता
गगन भरारी मारू लागली
हसलो मी म्हंटल उठा
आठ वाजलेत दूध तापवल पाहिजे
पेपर आत घेतला पाहिजे
सकाळ झाले
सुनेला good morning
आता म्हंटल पाहिजे