STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

4  

AnjalI Butley

Inspirational

ढगोबाई सोनपरी

ढगोबाई सोनपरी

1 min
426

ढगोबाई सोनपरी


सैरावैरा मन झाले

भटकत राहिलो रानीवनी

थकलेले शरीर व मन घेऊनी

नकळत शोधत राहीलो आसरा


आसरा शोधता शोधता

पडक्या मंदीराच्या खांबाचा 

आधार घेऊन बसलो

न विचार करता काही


वेळेचेही भान नव्हते

बसुन होतो एकाच ठिकाणी

मनात होते नाना विचार

लढत होतो मी त्यांच्याशीच


आभाळा कडे टक लाऊनी

करत होतो सामना 

माझ्याच नकारात्मक विचारांशी

परतुनी लावत होतो ते विचार


संध्याकाळच्या त्या वेळी

आभाळातल्या ढगांची 

पळापळ चालु होती

रंग ही बदलत होते ढगांचे


ढगांमध्ये ढगोबाई दिसली

सोनपरी समान मज

हरखुन गेले मन माझे

ताजे तवाने मग वाटले


ढगोबाई सोनपरी म्हणाली

मला दे ते तुझे नकारात्मक विचार

छु मंतर काली मंतर करत

बनवेल तुझे विचार सकारात्मक


ढगोबाई सोनपरी

हे घे माझे नकारात्मक विचार

आणि दे पटकन सकारात्मक विचार

चल पटकन दे सकारात्मक विचार 


परत कधी गेला माझ्या विचारांचा तोल

धावत ये तो सांभाळण्या परत...

त्या पेक्षा तु अस का नाही करत

माझ्या सोबतच राह सदा सर्वकाळ!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational