ढगांना हात लावू कशी
ढगांना हात लावू कशी
चला चला पळा पळा
पाहू ते आकाशातले उडणारे विमान!
उशीर झाला पळायला तर
आकाशात दिसणार फक्त पांढरी रेख!
चला चला पळा पळा
विमानात बसु!
आकाशात फिरू
ढगांना हात लावु!
बसता विमानात
दिसल्या खिडक्यांच्या काचा बंद!
केली विनंती हवाई सुंदर्यांना
करा खिडकिंच्या काचा खाली!
हसून तीने दिला नकार
ढगांना हात लावू मी कशी आता!
बसले गुपचूप सीट बेल्ट लावून
विमान खाली उतरण्याची वाट पाहत!
