STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy

3  

Supriya Devkar

Tragedy

दान श्वासाचे

दान श्वासाचे

1 min
194

दे मजला दान श्वासाचे 

नको हे जीवन आभासाचे 

घडी घडीला साम्राज्य भितीचे 

कारण ठरते आहे नियतीचे 


विश्वास ढळतो आहे कुणाचा 

ठोका चूकतो आहे मनाचा 

श्वास वाढतो आहे जनांचा 

आधार खचतो आहे जीवांचा


दुखणे सोसावे आपले आपण 

कोंडून घ्यावे आपले आपण

मनातली भिती सोसावी आपण 

बाहेर ही पडावे आपले आपण 


आता खरे आत्मनिर्भर होणार 

कुटुंबासोबत पूढे जाणार 

एकमेकांची काळजी घेणार 

संकंटावर या मात करणार 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy