चुलीचे आत्मकथन
चुलीचे आत्मकथन
ओळखलत का मला
मी गृहीणींच्या आठवणीतली सखी
नसेलच आठवत काही
तर ऐका माझी महती
काही वर्षांपूर्वी
खुप होते माझे महत्त्व
काळ जसा बदलला
आले गैस आणि सिलेंडर ला सत्व
पहिले तर मला मांडायला
दगडेच होती पुरेशी
नंतर केली मातीची
अन् आता तर काय
असते म्हणे सिमेंटची
कुठे मांडाव या चुलीला,?
कधी जावं जळणारा,?
घरातली लक्ष्मी कंटाळली माझ्या धुराला
म्हणुनच कि काय
भाळली गैस,स्टोव्ह आणि शेगडीला
पण अजुनही कुठे कुठे खेड्यापाड्यांत,
जपलं जातं मला,
मायेच्या मातीने लिपलं जातं मला,
जुन्या या माणसांमुळेच,
जागा आहे माझ्या अस्तित्वाला
पण कधी कधी,
मलाच वाटतं माझं कुतूहल,
चुलीवरचा रस्सा आणि भाकरी खायला,
जेव्हा गर्दी होते धाब्यावर
पण बदलत्या या जगात,
तुम्ही मला नाही ना विसरणार??
कुतूहलाबरोबरच खंतही वाटते जराशी
उद्या गृहीणीच तर म्हणणार नाही ना
ही चुल असते तरी कशी??
