STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

3  

Trupti Naware

Inspirational

चुका

चुका

1 min
682



बर्याच चुका झाल्या

नि स्वतःला तुरुंगात नेले

पण चुका सुधारण्याला

अनुभवाचे न्यायालयही कमी पडले..

तश्या चुका पुन्हा होवू नये

म्हणून स्वतःला सावरले

सावरताना काही चुकांनी

चुकून चुकण्यास भाग पाडले ..

मी स्वतः शी प्रामाणिक होते

कारण जगणे आणि लिहीणे

एक होत होते,,

कृत्रिम श्वास शब्दांचे

चुकांना मिटवून नवे अर्थ देत होते..

मनाचे उसवलेपण शिवायला

चुकांनीच सांगीतले होते

पण काही चुका दुरुस्त करणे

कुणालाही जमले नव्हते .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational