चपळ हा बाणा
चपळ हा बाणा
हरीण पाडस सुंदर ते छान,जंगलात फिरे मायलेकी दोन.
अन्नाच्या शोधात फिरे रानोमाळ,चुकता ही वाट होई तळमळ.
भासते सुंदरजंगलाची शान,पाहुनी हरपे मायेची तहान.
चाहूल लागता मन बावरले,मायलेकी जणू सावध जाहले.
चपळ हा बाणा अंगात भिनला,जंगल वनात आवाज घुमला.