आला पाऊस वाजत
आला पाऊस वाजत
आले वाजत गाजतढग ढोल बडवुनी,
सुसाट वेगाने सुटलंवार दिशा दिशातुनी
चिंब पावसाच्या सरीसडा पाडतो अंगणी,
खोल खोल जमिनीतरुजे पावसाचे पाणी
असा कसा रे पावसाआज बेफाम तू झाला,
हिरव्या माळ रानांवरपाला पाचोळा सांडला
असा उनाड पाऊसगेला मातीला भिजून,
येता चैतन्य निसर्गालासुगंध गेला दरवळून
थेंब थेंब पावसाचेटपटप गाणे गाती,
गर्द हिरव्या पानांतूनदवबिंदू असे ओघळती