Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajendrakumar Shelke

Inspirational

3  

Rajendrakumar Shelke

Inspirational

महिमा स्वातंत्र्याचा..!

महिमा स्वातंत्र्याचा..!

1 min
135


स्वातंत्र्य भारताचा

महिमा वंदितो अंतरी,

तुज पुजिले आता

केले प्रेम मी राष्ट्रावरी.


सह्याद्री हा बोलतो

जयजयकार क्रांतीचा,

फडकला तिरंगा

माझ्या प्रिय हिंदुस्थानचा.


रणांगणी भिडला

अन्याय दूर होण्यासाठी,

शूर शिपाई माझा

हर वार झेलण्यासाठी.


भाग्य लाभले मला

जन्मलो या मायभूमीत,

पूर्व जन्माचे पुण्य

किती घालू मी दंडवत.


स्वराज्य रक्षेसाठी

रक्त वीरांनी त्या सांडले,

मुक्त केल्या शृंखला

पारतंत्र्यातुन सोडले.


स्वातंत्र्याचा तो हक्क

शुरानी असा मिळविला,

देशभक्तीच्या पायी

रक्तात तिरंगा भिजला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational