STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

3  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

चला उठा रे।

चला उठा रे।

1 min
784


"चला उठा रे"


चला उठा रे, पेटून उठती।

मशाल हाती घेवून क्रांतीची।

रक्त आमचे का घ्यावे पिवूनी।

किंमत जाणूनी पाण्याची।१

।

सळसळते रक्त आमुचे।

पिंजले, पिचले कईक युगे।

दाबले, दडपवीले माणूसपण।

आमुचे युगो युगे।२

।

आता नाही राहू उगी।

लेकरे आम्ही आंबेडकराची।

मुक जिभेला वाचा फुटली।

कायदा वाचता माणुसकी।३

।

माणुस म्हणूनी का न गणती।

निच हलकी जात अमुची।

कोण कारणे उच्चभ्रू हे झाले।

रक्त मास का त्यांचे वेगळे।४

।

चला उठारे पेटून उठती।

मशाल हाती घेवून क्रांतीची।

।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational