चला करूया संवर्धन गडकोटांचे
चला करूया संवर्धन गडकोटांचे
चला हातभार लावू
इतिहास जिवंत ठेवाण्यासाठी
ठसा पुन्हा एकदा
इतिहासाचा उमटवण्यासाठी
करू संवर्धन गडकोटांचे
ढालीसारख्या सह्याद्रीचे
कैक वार झेलले गणिमांचे
फुलले राज्य त्यावरती शिवरायांचे
तेवत ठेऊ मशाल
या अमर इतिहासाची
प्राण दिले कैकांनी
साक्ष आहे ही स्वराज्याची
पेलून मरण
तलवारीच्या टोकावरती
फडकावले भगवे निशाण
स्वराज्याचे याच गडकोटांवरती
सोसले कैक भडीमार तोफगोळ्यांचे
पाहिले कित्येक रणसंग्राम युद्धाचे
जपले पाहिजेत हे गडकोट
कारण अजूनही साक्ष देतात अनमोल इतिहासाचे
