चल जाऊ परतुनी
चल जाऊ परतुनी
चल जाऊ परतुनी
आपल्या त्या गावी
अडवळण तो रस्ता
पाय वाट ती पहावी
मागे सोडून झगमग
आज या शहराची
ओढ लागली मला
परत माझ्या गावाची
आठवणीतला आजही
आठवतो मला तो गाव
अनवाणी पायाने
दोस्ता संग हूंदडलो होतो राव
कैरी चिंचा चारं बोरं
लय भारी रानमेवा
दोस्ता संग गावठी तळ्यात
पोहायचं जवा तवा
उन्हातानात हिंडायचो
सारे रान मळं
काट्याकुट्याची चिंता नसे
नसे कशाच भान
संग आणलेली ठेचा भाकरं
तोंडी लावायला असे कांदा
विहिरीचं असे गार गार पाणी
रोज चाले हा धंदा
हरवले ते सोनेरी दिवस
वाटते वेळेलाा थोडं न्याव मागे
बालपणीचे सुंदर दिवस
परत एकदा जगावे
