अभंग
अभंग
1 min
138
निल कंठ ज्याचे/लेतो व्याघ्रांबर
तो भोळा शंकर/नाम त्याचे/१/
शिरी वाहे गंगा/चंद्रकोर डोई
भस्म अंगी लेई /जटा धारी/२/
नंदीचे वानह/सर्प घाली गळा
रुद्राक्षांच्या माळा/ शोभे त्याला/३/
त्रिशूल डमरू/स्मशानी राहतो
अंगी भस्म लेतो/भोळा शंभू/४/
भोळा तो शंकर/शोभे गौरी पती
अर्धांगी पार्वती/उमानाथ/५/
