पळस
पळस
1 min
190
माळावरच्या दगड धोंड्यात
रन रनत्या त्या उन्हात
ना जमिनीत ओलावा
ना कोण्या झाडाची सोबत त्याला
त्याच्याच पानाने आज सोडली होती साथ
शुष्क झालेल्या फांदीचा फुलांनी धरला हात
शेंंद्रर्या रंगाच्या फुलांनी बहरवले होते त्याला
पेटलेल्या आगी सारखा भासत होता नजरेला
येणार जाणाऱ्यांच्या नजरा...
नजर लावत होत्या त्याला...
