पाई होती बेडी
पाई होती बेडी
पाई होती ग बेडी
नव्हती शिक्षणाची गोडी
चूल आणि मूल
आमच्यावर लादली गाठोडी
आली तेव्हा सावित्रीमाई
मुलींना शिक्षणाचे धडे देई
कााय होते तिच्या मनी
आमच्यासाठी धोंडे खाई
किती केला वेेेभिचार
सोसले ग अत्याचार
डगमगली नाही माई
मुलींच्या शिक्षणाचा केला उद्धार
तुझ्यामुळे हाती लेखणी
तुझ्यामुळे घेतली शिकवणी
उपकार तुझी माई
नाही फिटणार या जन्मी
