वाटे कधी असे
वाटे कधी असे


वाटे कधी असे ही...
टिपोऱ्या चांदण्या राती
स्वतःमध्ये हरवून जावे
उन्हाच्या झळा दूर सारत
थंड झुळकेनेे साथ द्यावे
वाटे कधी असे ही...
निशब्द पडलेल्या रस्त्या वरती
चंद्राच्या मंद प्रकाशात
आपल्याच सावली मागे
संथ गतीने चालत राहावे
वाटे कधी असे ही...
दुनियादारीच्या गर्दीतून
स्वत:हाला एकांतात ओढत न्यावे
थकलेल्या या देहाला
रम्य ठिकाणी विसावा द्यवेे
वाटे कधी असे ही...
दुरच्या त्या डोंगरावरती
मावळतीला न्याहाळत राहावे
सोबत नको कोणाची
एक क्षण स्वतःसाठी जगावे
धावण्याच्या या शर्यतीत
स्वतःलाा हरवून बसलो आहे
प्रतिबिंब स्वत:चे न्याहाळतांना
स्वतःत स्वतःला शोधत आहे
आयुष्य हातातून निसटताना
जगायचे राहून गेले आहे
वाटे कधी असे
ही खंत मनी दाटत आहे