STORYMIRROR

Sandhya Vaidya

Inspirational

4  

Sandhya Vaidya

Inspirational

चक्रव्यूह

चक्रव्यूह

1 min
305

फसलेली ही जनता,चक्रव्यूह हा तुटेना

लुटली श्रद्धेत आंधळ्या, उपायही सुचेना


तिढा या देवतांचा, गमक भक्तांना कळेना

विश्वास ठेऊ कुणावर, अज्ञानातून जागेना


अन्याय अत्याचार, माता भगिनीं सोसवेना

सत्याचा अवलंब, तर न्यायालयातही दिसेना


फुटतात रोज नारळं, गरिबा पुरेसे मिळेना

ओतून तेल दगडावर, पाप धुतले जाईना


जंगलात पेटतो वणवा, समाजही जळतो ना

अज्ञानाचे हे कोलीत, काही केल्या विझेना


विज्ञानात जगतो आहे, अंधानुकरण संपेना

जगण्यातली सहजता,कधी येईल कळेना


विषारी राजकारण, पोट तयांचे भरेना

गावावरील समस्या, विठोबालाही उमजेना


विषमतेचा तो नाग, देशातून या जाईना

सदाचारी भारताला, हा अनाचार सोसवेना


घराघरात निघतो, काळा धुर खाली बसेना

कलह वंचित समाज, आज कुठेही दिसेना


अडकून चक्रव्यूहात या, पाय पुढे जाईना

पुढच्या पिढीला, संदेश सुटकेचा सांगाना



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational