चित्रकाव्य-शिल्पकार
चित्रकाव्य-शिल्पकार
अरे संसार संसार
किती करशी विचार
कपाळी जे लिहिलेलं
जीणं नशीबी आल रंं
वाटेच्या या दगडाला
देतो आम्ही रे आकार
देतो त्याला देवपण
असे आम्ही शिल्पकार
बाळासाठी उद्याची रे
चिंता ऊरी बाळगते
दोन पैसे मिळवून
काम कष्टाचे करते
हाती माझ्या बाळ नसे
रुप देवाचेच असे
जिणं जरी कष्टाचे हे
मुखी समाधान दिसे
जीवनाच्या वाटेवरी
हाव नको धरु मनी
जग सुखाचे जिवन
आहे त्यात समाधानी
