STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

4  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

चित्र हे कोरे कोरे

चित्र हे कोरे कोरे

1 min
598


: *चित्र हे कोरे कोरे*


चित्र आज मी रेखाटिते।

स्वप्नात साजना तुज पाहते।

रंग सोबतीचे, थोडे प्रितीचे।

चित्रात मी रे आज भरीते।

।

मी मुक्त मनोहारी

धुंदीत बहरणारी

जशी प्रितीची बाग

अंगणी तुझ्या फुलणारी।

।

गित माझे जिवनगाणे

सवे तुझ्या आळवीणे

स्वर माझे तु ऐकावे

दोघांनी सुरात चिंब भिजावे।

।

स्वप्न हे सांजसमयी

हृदयात सखया मी पाही

चित्र हे कोरे कोरे

रंग यात कोणते भरू रे।

।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational