चिंता मनाची !
चिंता मनाची !
आहे सोबत एकमेकांच्या
म्हणून आज निवांत आहे .
माझ्या मागे तुझे काय ?
ही सल मन पोखरत आहे !
नाही पोटाला मूलबाळ ,
जबाबदारीतून मुक्त आहे .
कसे होणार एकटीचे ?
ही एकच खंत आहे !
सोडून गेलो आधी तरी ,
जीव घुटमळत राहील .
तुझ्यासाठी थांबू कसं ?
हीच एक चिंता आहे !
