Urmi Hemashree Gharat

Abstract


3  

Urmi Hemashree Gharat

Abstract


चिंबस्पंदने

चिंबस्पंदने

1 min 51 1 min 51

थेंब थेंब पावसाचा मोहरला सुंदर 

अंकुरली नवलाई धुळवडीचा पडला विसर 


दवबिंदू पुन्हा नव्याने मोतियाच्या बंधात रंगला

सोनेरी रविकिरणांच्या फौजाही मंदावल्या


रानवेली सजल्या हरित तृणाच्या सोबत 

मोहक पुष्पांचा फुलोरा बहरला डौलात 


बंधने स्वच्छंद मन ही मोकळे धुंद

स्पंदने सुखांत सौख्य लहरी मुठीत


पावसाची आपली एक वेगळीच मौज 

चिंब होई धरा चातकाची भागे हौस


Rate this content
Log in

More marathi poem from Urmi Hemashree Gharat

Similar marathi poem from Abstract